Episodes

  • # 1650: "भोसला मिलिटरी स्कूल, नाशिक येथील कोदंडधारी श्रीराम" कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jan 6 2025

    Send us a text

    भोसला मिलिटरी स्कूलमधील ही रामाची मूर्ती अत्यंत खास आहे.
    सामान्यतः रामाच्या मूर्तीमध्ये सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांची साथ दाखवली जाते.
    पण या मूर्तीत एकटे कोदंडधारी श्रीराम शौर्यपूर्ण मुद्रेत उभे आहेत.
    श्रीरामाची ही अशी एकमेव एकटयाची कोदंडधारी मूर्ती आहे ..!!
    म्हणून भोसलाच्या विद्यार्थ्यांना 'रामदंडी' म्हणतात ..!!
    ही राममूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकार श्री सदाशिव साठे यांची ही कथा.

    Show more Show less
    4 mins
  • # 1649: रामनामाचे अभेद्य कवच. ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jan 5 2025

    Send us a text

    दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्र, गुरू विश्वामित्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, मंत्रीगण आणि अयोध्यावासी शरयू नदी किनारी जमले. वीर हनुमान शांतपणे बसून रामनाम जपत होते.

    प्रभू रामचंद्रांनी जड अंतःकरणाने धनुष्य उचलले. गुरू विश्वामित्र यांच्या परवानगीने परम भक्त हनुमानावर बाण सोडला.
    रामबाण तर सुटला, परंतु त्याच क्षणी काही अद्भुत घडले. . रामबाण हनुमानाजवळ पोहोचला परंतु रामनामाच्या अभेद्य कवचला भेदू न शकल्याने तो निष्प्रभ होऊन रामचंद्रांकडे परतला.

    Show more Show less
    9 mins
  • # 1648: "राजा रविवर्मा यांची प्रेरणा, सुगंधाबाई". लेखक रणजीत देसाई. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ).m4a
    Jan 4 2025

    Send us a text

    राजा रविवर्मा सुगंधा बाईंना म्हणाले,
    "बाईसाहेब, मी एका श्रीमंत घराण्यात, वेदपठण, कथाकीर्तन ऐकत मी वाढलो. त्यामुळं नलदमयंती, हंस-दमयंती, सैरंध्री, द्रौपदी, ही सारी रूपं माझ्या मनात रेंगाळत होती."
    "पण ती द्रौपदी, ती सीता, ती लक्ष्मी, ती सरस्वती मी आणू कुठून?"
    "ह्या देवता होण्याचे सामर्थ्य देवानं तुमच्या रूपाला दिलेलं आहे.
    तुम्ही मला साहाय्य केलं तर, देवतांना साकार करण्याची माझी सारी स्वप्नं साकार होतील."

    Show more Show less
    13 mins
  • # एक पाऊल मातीसाठी. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jan 2 2025

    Send us a text

    जेव्हा युरोपियन-अमेरिकन स्थायिकांनी आयोवामध्ये पहिल्यांदा नांगरणी सुरू केली तेव्हा त्यांना आढळलं की हवामान आणि स्थानिक जमिनीच्या प्रकाराने इथे या सेंद्रिय पालापाचोळ्याची, वाळू आणि गाळ एकत्र होऊन चिकणमाती नावाची पौष्टिक, समृद्ध अशी माती तयार झाली आहे. यामुळे आयोवाला पृथ्वीवरील सर्वात सुपीक मातींपैकी एक असलेली माती मिळाली, आणि तिने गेल्या 160 वर्षांमध्ये युनायटेड स्टेट्समधील आयोवाला कॅार्न, सोयाबीन आणि ओटस् च्या सर्वात मोठ्या उत्पादकांपैकी एक पण बनवलं.

    Show more Show less
    8 mins
  • # 1646: डॉ विनय कोपरकरांची गोष्ट. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jan 1 2025

    Send us a text

    डॉक्टरांच्या हातात रिपोर्ट होते.
    निदान झालं .... नॉन ALCOHOLIC लिव्हर सिरॉसिस ..
    व्यसनापासून हजारो हात लांब असलेला मी .. लिव्हर खराब झालं होतं..
    माझ्याकडे खूप पैसा आहे.
    पण पैसा असूनही जगात कुठेच अस शॉप नाही जिथून मी हृदय, किडनी, फुफ्फुस, हात, पाय विकत घेईन!
    माझ्यासमोर बसलेले तुम्ही सगळे खूप श्रीमंत आणि नशीबवान आहात.
    निसर्गाने दिलेले सगळे अवयव तुमच्याकडे आहेत.
    त्याची काळजी घ्या.
    व्यसन करून छातीच खोक करून घेऊ नका. कुणीतरी अज्ञात माणसाच्या अवयव दानाच्या योग्य निर्णयामुळे आज मी तुमच्या समोर उभा आहे......!

    Show more Show less
    8 mins
  • # 1645: हरवलेली माणसे. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Dec 31 2024

    Send us a text

    पूर्वी आमच्या आळीत एक म्हातारा मीठवाला यायचा. “अरे, अर्धी बरणी मीठ सांगितल होत,” असं म्हटलं तर म्हणायचा, “ तसे केले तर आपल्याला आयुष्यात अर्धंच सुख मिळतं. तुम्ही पैसे अर्ध्या बरणीचेच द्या.”
    रघू बाजारभावापेक्षा स्वस्त आंबे विकायचा.गिऱ्हाईकांना कसं पटवायचं, माणूस कसा ओळखायचा, मेहनत कशी करायची हे शिकत मग धंद्यात यायचं. असे त्याला वडिलांनी सांगितले होते.
    फुलवाला, केळीवाला, बिस्कीटवाला......ही सगळी माणूसपण जपणारी माणसे आता हरवून गेलीत...!

    Show more Show less
    9 mins
  • # 1644: चोराचा आर्थिक विकास! कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Dec 31 2024

    Send us a text

    एका सेवानिवृत्त गृहस्थाने पत्नीसह महिनाभर त्यांच्या मूळ गावी जायचे ठरवले. चोर आल्यास त्याला एक पत्र लिहून ठेवले.
    परतल्यावर चोराचे पत्र त्यांची वाट पाहत होते....
    "माझ्या निवृत्त मित्रा, टिप्सबद्दल धन्यवाद..
    मिशन यशस्वीरित्या पूर्ण झाले आणि भरपुर कमाईही झाली.
    म्हणून तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी एक लाख रुपये रोख ठेवले आहेत."

    Show more Show less
    4 mins
  • # 1643: डायरी माझी सखी. लेखिका नीता चंद्रकांत कुलकर्णी. कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे.)
    Dec 29 2024

    Send us a text

    काही वर्षांपूर्वी आकाराने जरा मोठी अशी एक सुरेख डायरी मला मिळाली. मनात आलं या डायरीचा आपण काहीतरी वेगळा उपयोग करावा...
    काय करावं ते मात्र सुचत नव्हतं. जानेवारी संपत आला तरी डायरी कोरी होती.
    " सखे "...
    ही फार सुरेख कविता माझ्या पहिल्यांदाच वाचनात आली.
    " सखे..
    तु दिलेल चांदण
    माझ्या पडशीमध्ये तुडुंब आहे.."
    आणि त्या दिवशी डायरीचा श्री गणेशा झाला.....!
    कुसुमाग्रजांच्या" सखे " या कवितेनी सुरू झालेली ही डायरी माझी सखी झाली आहे... !

    Show more Show less
    11 mins