• राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक १८ सप्टेंबर २०२४, रात्री ८.०५ वाजता
    Sep 18 2024

    ठळक बातम्या

    एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी केंद्रीय मंत्रीमंडळानं स्वीकारल्या, देशभरात सहमती निर्माण करुन २ टप्प्यात अंमलबजावणी होणार

    शेतकऱ्यांची उत्पन्ननिश्चिती, पोषणमूल्य आधारित खतानुदान, आणि ६३ हजार गावातल्या आदिवासींचं जीवनमान उंचावणाऱ्या योजनांनाही मंजुरी

    वर्षाला १ हजार रुपये भरून लहान मुलांच्या नावे सुरू करता येणार राष्ट्रीय पेन्शन योजनेचे वात्सल्य खाते

    जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५८ टक्क्यांहून अधिक मतदान

    आणि

    हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, जुनी पेन्शन योजना आणि २५ लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत देण्याचं आश्वासन


    Show more Show less
    10 mins
  • NPS वात्सल्य योजना
    Sep 18 2024

    NPS वात्सल्य योजना: उज्वल भविष्याचा आश्वासक पाया

    Show more Show less
    15 mins
  • प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक १८ सप्टेंबर २०२४, संध्याकाळी ७.०० वाजता
    Sep 18 2024

    ठळक बातम्या

    एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी केंद्रीय मंत्रीमंडळानं स्वीकारल्या, देशभरात सहमती निर्माण करुन २ टप्प्यात अंमलबजावणी होणार

    शेतकऱ्यांचं उत्पन्न निश्चित करणं, रबी हंगामासाठी खतांवर पोषणमूल्य आधारित अनुदान आणि ६३ हजार गावातल्या आदिवासींचं जीवनमान उंचावण्यासाठीच्या योजनांनाही केंद्र सरकारची मंजुरी

    यंदाच्या खरीप हंगामात राज्यात कृषी उत्पन्न ३१ लाख मेट्रीक टनांनी वाढण्याची आशा

    आणि

    चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत मालविका बनसोडची पॅरिस ऑलिम्पिकमधल्या कांस्य पदक विजेत्या चीनी खेळाडूवर मात


    Show more Show less
    10 mins
  • प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक १८ सप्टेंबर २०२४, दुपारी ३.०० वाजता
    Sep 18 2024

    ठळक बातम्या

    राज्यात गणेशोत्सवाच्या पर्वाची गणेश विसर्जनाने सांगता / पुण्यात अद्याप विसर्जन मिरवणुका सुरु

    साडेबारा टक्के सीमाशुल्क भरुन आयात केलेलं खाद्यतेल ग्राहकांना किरकोळीत वाढीव दराने विकू नये असं केंद्रसरकारचं खाद्यतेल विक्रेत्यांना आवाहन

    एनपीएस- वात्सल्य योजनेचं केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

    आणि

    गणेशविसर्जनाच्या वेळी ८ जणांचा मृत्यू


    Show more Show less
    10 mins
  • राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक १८ सप्टेंबर २०२४, दुपारी १.३० वाजता
    Sep 18 2024

    ठळक बातम्या

    जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू/ सकाळी ११ वाजेपर्यंत २६ पूर्णांक ७२ शतांश मतदान


    साडेबारा टक्के सीमाशुल्क भरुन आणलेलं खाद्यतेल ग्राहकांना वाढीव दरानं न विकण्याचं केंद्रसरकारचं विक्रेता संघटनांना आवाहन


    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण नवी दिल्लीत एनपीएस- वात्सल्य योजनेचा प्रारंभ करणार


    आणि

    महाराष्ट्रात गणेशोत्सवाच्या चैतन्यपर्वाची गणेश विसर्जनाने सांगता


    Show more Show less
    10 mins
  • आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, राष्ट्रीय बातमीपत्र, दिनांक १८ सप्टेंबर २०२४, सकाळी ८.३० वा.
    Sep 18 2024

    ठळक बातम्या

    • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ओडिशातील भुवनेश्वर इथं विविध प्रकल्पांची पायाभरणी तर काही प्रकल्पांचे लोकार्पण.


    • केंद्रातील एनडीए सरकारचे सलग तिसऱ्या कार्यकाळातील 100 दिवस पूर्ण.


    • जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.


    • पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर.


    • आशियाई चॅम्पियन्स हॉकी स्पर्धेत चीनचा पराभव करत भारत पाचव्यांदा विजेता.
    Show more Show less
    10 mins
  • आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्तविभाग, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक १८ सप्टेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.
    Sep 18 2024

    ठळक बातम्या

    • गणेशोत्सवाच्या चैतन्यपर्वाची राज्यभरात गणेश विसर्जनानं सांगता; पुढच्या वर्षी लवकर या अशी साद घालत बाप्पांना भावपूर्ण निरोप
    • गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा मृत्यू
    • मराठवाड्याची कालबद्ध प्रगती करण्याचं शासनाचं ध्येय असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन
    • आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत चीनवर मात करत भारत सलग पाचव्यांदा अजिंक्य
    Show more Show less
    10 mins
  • आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, प्रादेशिक बातमीपत्र, दिनांक १८ सप्टेंबर २०२४, सकाळी ७.१० वा.
    Sep 18 2024

    ठळक बातम्या

    • अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून सुरुवात


    • पर्यावरण रक्षणासाठी राज्याच्या प्रयत्नांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल, मुख्यमंत्र्यांचा वर्ल्ड ऍग्रीकल्चर फोरमकडून आज सन्मान


    • मराठवाड्याच्या विकासाची २९ हजार कोटी रुपयांची कामं पूर्णत्वाकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन


    • दहा दिवसीय गणेशोत्वाची सांगता, धुळे-नाशिक इथं दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू


    • आशियाई चषक हॉकी स्पर्धेत भारताला पाचवं अजिंक्यपद
    Show more Show less
    10 mins