• Punavechya Gappa | पुनवेच्या गप्पा | Marathi Podcast

  • By: मी podcaster
  • Podcast

Punavechya Gappa | पुनवेच्या गप्पा | Marathi Podcast

By: मी podcaster
  • Summary

  • मराठी भाषचं भविष्य वैगरे अश्या मोठं मोठ्या विषयांवर आपण भाष्य करणार नाही आहे, पण रोजच्या बोली भाषेत सोप्या शब्दांसाठीही आजकाल इंग्रजी शब्द वापरले जातात, त्याचा काय परिणाम होतो ह्याचं एक उदाहरण पाहूया. आता पहा लाल भोपळा किंव्हा ज्याला आमच्या विदर्भात डांगर म्हणतात त्याचं नाव आलं की डोळ्यासमोर कशी रस्सेदार चमचमीत भाजी येते तेच त्याला pumpkin म्हंटलं तर कदाचित pumpkin pie वगैरे पदार्थ डोळ्यासमोर येतील. मुद्दा एवढाच आहे की भाषा आणि संस्कृती ह्याचा खूप जवळचा संबंध आहे.. आणि म्हणूनच विस्मरणात चाललेले काही शब्द आणि त्याच्या बद्दलच्या गप्पा करायला येत आहोत आपल्या पॉडकास्ट मध्ये..
    2024 मी podcaster
    Show more Show less
activate_Holiday_promo_in_buybox_DT_T2
Episodes
  • कज्जा कचेरी
    May 13 2022
    कज्जा कचेरी एक वाचलेली गोष्ट आठवली. गोष्ट काका व पुतण्याची आहे. दोन भाऊ खेड्यातले. मोठा हुषार. शिक्षणाची आवड. शिकून मोठा अधिकारी होतो. शहरात नोकरी करतो. स्वतःचे घर बांधतो. लग्न करतो. योग्यवेळी सेवानिवृत्त होतो. त्याला एक मुलगा असतो. तो आता तरूण झालेला असतो. लहानपणापासून अधेमधे आईवडिलांबरोबर खेड्यात जात असतो. त्याचा काका त्याच्या वडिलांपेक्षा बराच लहान असतो. काकाचे शिक्षणात लक्ष नसते. वडील मात्र काकाने शिकावे म्हणून फार प्रयत्न करतात. पण काका शिक्षणापेक्षा शेतीत रमतो. वडिल शेतीसाठी होणारा खर्च त्याला पुरवीत असतात. म्हातारपणामुळे आईवडिलांचे निधन होते. मग मोठा भाऊच लहान भावाला पैसा पुरवीत असतो. त्याचे लग्नही करून देतो. लग्नानंतरही मोठा भाऊ लहान भावास पैसा पुरवीत असतो. हे सर्व मोठ्या भावाचा मुलगा पाहत असतो. ऐके दिवशी तो वडिलांना म्हणतो की, आता काकाला पैसे पाठविणे बंद करा. त्याचे वडिल कांही त्याचे ऐकत नाही. मग त्या दोघांमध्ये वादविवादाला सुरूवात होते. शेवटी कंटाळून वडिल त्याला वडिलोपार्जीत मिळकतीचे वाटण्यासंदर्भातील मुखत्यार पत्र देतात व मुलाला पाहिजे ते करण्याची मोकळीक देतात. मग हा मुलगा, काकांना वडिलोपार्जीत मिळकतीची वाटणी मागतो. पण काका त्याला स्पष्टपणे नकार देतो. मग मात्र पुतण्या काकांविरूद्ध न्यायालयात खटला दाखल करण्याची तयारी करतो. पुतण्याला शेतीची, घराची वाटणी करण्यासाठी मोजमाप घेणे, वेगवेगळे कागदपत्र जमा करण्यासाठी खेड्यात वारंवार जावे लागायचे. पहिल्यांदा तो जेंव्हा खेड्यात जातो, त्यावेळी गावात कुठे राहायचे हा प्रश्न त्याच्यासमोर येतो. पण तो गावात आल्याचे कळताच त्याचा काका स्वतः त्याला घरी घेऊन जातो. तो काकाच्या घरी पोहचल्याबरोबर त्याच्या लहानग्या चुलत भावंडानी त्याला आनंदाने मिठ्या मारल्या. मोठ्या भावाच्या आगमनाचा त्यांना खूप आनंद झाला होता. ते त्याला सोडायला तयार नव्हते. शेवटी काकूने जेवायला बोलावल्यावर त्याची सुटका झाली. मोजमापाच्या कामात त्याला काकाने सर्व मदत केली. तलाठी कार्यालय, नायब तहसीलदार कार्यालय, भूलेख कार्यालय, तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जेथे जेथे त्याला जावे लागे किंवा काम असे तेथे तेथे काका त्याला सोबत करी व मदतही ...
    Show more Show less
    10 mins
  • पगडी, पागोटे व जिरेटोप
    Apr 1 2022
    पगडी, पागोटे व जिरेटोप जगातील पुरूषांकडून डोके झाकण्यासाठी विविध साधनांचा/वस्तुंचा वापर पूर्वपरंपार आहे. त्यांची नांवेही वेगवेगळी आढळतात .पगडी,पागोटे,फेटा अशी त्यातली कांही नांवे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, पारसी व अन्य अनेक धर्मात शुभ प्रसंगी डोके झाकणे अनिवार्य असते. स्त्रीया देखील डोक्यावर पदर, घुंगट घेतांना तसेच हॅट्स व विविध प्रकारच्या टोप्या/वस्तू वापरतांना आढळतांना दिसतात. सैन्य व पोलिस दलात तर टोप्या गणवेषाचा अविभाज्य भाग असतो. समारे ७०-८० वर्षापूर्वी पागोटे घालण्याच्या प्रकारानुसार व्यक्ती कोणत्या समाजाचा आहे ते कळायचे. वारक-यांची ओळख तर त्यांच्या टोपीमुळेच होते. स्वातंत्र्य लढ्यात तर गांधी टोपीचे योगदान फार मोठे. संघाची काळी टोपी, सावरकरांची गोल उभी काळी टोपी,आर.पी.आय.ची निळी टोपी आणि किसान आंदोलनाची हिरवी टोपी यामुळे डोक्यामधील विचारधारा डोक्यावरच्या टोपीमुळे सहज लक्षात येते. लग्न समारंभात आता फेटा बांधणे अगत्याचे झाले आहे. पगडी, पागोटे यांचा संबंध प्रतिष्ठा व आत्मसन्मानशीही जोडला जातो. पागोटे दुसर्‍या व्यक्तीच्या पायावर ठेवणे म्हणजे आत्मसन्मान त्या व्यक्तीच्या चरणी ठेवणे असे समजले जाते. पगडी उछालना या हिंदी म्हणीचा अर्थ आत्मसन्मानाचा भंग करणे असा होतो. कुणाच्या मृत्यूची बातमी कळताच डोक्यावरची टोपी काढून मृत व्यक्तीच्याप्रती सन्मान प्रगट केल्या जातो. युध्दात डोक्याला ईजा होऊ म्हणून शिरस्त्राण वापरले जाते. तर स्वयंचलित दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर सक्तीचा आहे. राजस्थानी, गुजराथी व अन्य राज्यातील पगड्या त्या त्या राज्याचे वैशिष्ट्य असतात. राजे, प्रधान मंत्री, मंत्री, सेनापती यांच्या पगड्या त्यांच्या मानाप्रमाणे असत. प्रत्येक राजाची पगडी विशेष असायची. पुण्यप्रतापी छ. शिवाजी महाराज व हिंदूह्रदयसम्राट छ. संभाजी महाराज हे जिरेटोप घालत. हे दोन्ही राजे हिंदुधर्म भूषण. सभोती संकटे वाढून ठेवलेली. गनिम केंव्हा घाला घालतील याचा नेम नाही. अष्टौप्रहर जागृत असणे व युध्दसज्ज असणे गरजेचे. त्यामुळे शिर संरक्षित असणेही महत्वाचे. पण कसे, तर इतरांच्या लक्षात येऊ न देता. यामुळे त्यांचा मुकूटही विशेष प्रकारचा. त्याचे सुप्रसिध्द नांव जिरेटोप. जिरे हा ...
    Show more Show less
    6 mins
  • शुभकार्याचा मुहूर्त
    Mar 25 2022
    शुभकार्याचा मुहूर्त गणपतराव देसमाने हे काळगे गावचे रहिवासी. व्यवसाय पुर्ण वेळ शेती. एक १८ एकरचे शेत गावाजवळ व दुसरे २२ एकरचे शेत गावापासून सुमारे ८-९ किलोमीटरवर. घरात बायको, एक मुलगी व एक मुलगा. मुलगी व मुलगा दोघेही गावच्या शाळेत शिकतात. शेतासाठी दोन खिल्लारी बैलजोड्या शेतातल्या गोठ्यात बांधलेल्या. काही शेळ्या व एक कोंबड्यांचे खुराड घराच्या अंगणात. गणपतराव शेतात निरनिराळे प्रयोग करायचे. त्यांची शेतं नहराच्या सिंचनाखाली आली होती. पाण्याची विपुलता होती. त्यामुळे शेतीतील काही भाग त्यांनी बागायती म्हणून ठेवला होता. शेतात भरपूर चारा असल्याने त्यांनी दूधदुपत्यासाठी दोन गायी घेतल्या होत्या. त्याही त्यांनी शेतातील गोठ्यातच बांधल्या होत्या. त्यांच्या बायकोला गायी घरच्या गोठ्यात हव्या होत्या. पण हिवाळा असल्याने गणपतरावाचे मत असे होते की, चारापाणी शेतात बक्कळ असल्याने गायींसाठी गोठा अंगणात हिवाळा संपतेवेळी बांधू. हिवाळा संपायला आला. शेतातली पिके घरात आली. भुसकुतलेले धान्य जरी मशिनीवर साफ केले असले तरी धान्याबरोबर खडे, थोडाबहुत काडीकचरा, भुसा असतोच. कणगीत ते निवडून पाखडून व कडूलिंबाच्या पानाचे थर लावून भरावे लागते. अशाने धान्याची वज चांगली राहते. हिवाळा संपल्या संपल्या गावाची जत्रा भरते. औंदा गणपतरावांचा आतेभाऊ शहरातून यात्रेसाठी बायको, पोराबाळासहीत आला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. पण गणपतरावाच्या बायकोला शेतातून दूध येईपर्यंत ताटकळत बसावे लागे. चहा घेतल्याखेरीज पोटाचा झाडा होत नसल्याने पाहुणे बेचैन असत. शेवटी गणपतरावांची बायको वैतागली. पाहूण्यांच्या देखत तिने विषय काढला. " अवो, गाईचा गोठा तयार कराचा नव्हं. कवा कराचा म्हंतो मी." गणपतराव म्हणाले, " अवो, आता लई काम नाय वावरात. पाखाळणीला गायी बांधू घरच्या गोठ्यात." खेड्यातली भाषा पाहूण्यांच्या डोक्यावरून गेली. त्याने न राहवून गणपतरावाला विचारले " भाऊ, पाखाळणी म्हंजे काय रे" गणपतराव म्हणाले, " अरे, जत्रेत देवाची आंगोळ होते ते म्हंजे पाखाळणी." विषय तरीही स्पष्ट होत नाही, होय ना? यापूर्वी या लेखात "पाखडणे" हा शब्द आलेला आहे. भुसं भरलेल्या धान्याला स्वच्छ करण्यासाठी ते पाखडावे लागते. स्वच्छ करण्याच्या कृतीचा पाखाळणी या ...
    Show more Show less
    5 mins

What listeners say about Punavechya Gappa | पुनवेच्या गप्पा | Marathi Podcast

Average customer ratings

Reviews - Please select the tabs below to change the source of reviews.